मोदींच्या विखारी विधानाविरोधात नागरिकांचा संताप, 17 हजारांहून अधिक जणांनी निवडणूक आयोगाला लिहले

काँग्रेस सत्तेत आल्यास सर्व संपत्ती मुस्लिमांकडे वळती करेल, अशी विखारी विधाने करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, अशी तक्रार तब्बल 17 हजारांहून अधिक नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मोदी जातीय हिंसाचार आणि रक्तपात घडवून आणण्यासाठीच अशी विधाने करत असून हा धर्मनिरपेक्षतेवर घाला असल्याची तक्रार याआधीच संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी एक्सवरून निवडणूक आयोगाने नागरिकांची पत्रे गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक आयुक्त आणि अधिकाऱयांचा पह्टोही त्यांनी ट्विट केला असून निवडणूक आयोगाला खोचक शब्दांत सुनावलेही आहे. मोदींनी केलेल्या विधानावरून संपूर्ण देशात संताप व्यक्त करणाऱया प्रतिक्रिया येत आहेत. नेटकऱयांनीही मोदींवर अक्षरशः टीकेची झोड उठवली आहे.

टेलरचा तरी आदर्श घ्या हा पह्टो ऐतिहासिक ठरेल, परंतु त्यांनी जे कोट घातले आहेत ते तयार करणाऱया टेलरचा तरी निवडणूक आयोगाने आदर्श घ्यायला हवा, असे रवीश कुमार यांनी म्हटले आहे. तसेच जर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई करू शकत नसाल तर कमीत कमी तुमचे कोट शिवणाऱया टेलरचे तरी नाव सांगा. त्याने त्याचे काम परफेक्ट केले आहे. त्याच्याकडे तर कोणतेही अधिकारही नाहीत आता निवडणुकांची वेळ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दिल्लीतील पोस्टर्सवरही कारवाई नाही

निवडणूक आयोग मोदींविरोधात काहीतरी कारवाई करेल अशी आशा आहे. परंतु निवडणूक आयोगाकडून ही आशा ठेवावी का, असा सवाल जनता विचारताना दिसत आहे. निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी येत आहेत. दिल्लीत सत्ताधाऱयांची मोठमोठाली पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या पोस्टर्सवर निवडणूक आयोगाने अद्याप कारवाई केलेली नाही, असा आरोप काँग्रेसने केल्याकडेही रवीश कुमार यांनी लक्ष वेधले आहे.