भिवंडीतील काँग्रेसच्या 18 बंडखोर नगरसेवकांना अभय  

गेल्या वर्षी महापौरपदाच्या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या बंडखोर 18 नगरसेवकांना अभय मिळाले आहेत्यांच्या विरोधातील याचिका कोकण विभागीय आयुक्तांनी फेटाळली आहेया नगरसेवकांनी आधीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असून आजच्या निकालानंतर नगरसेवकांनी जल्लोष केला

सर्वाधिक 47 नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षातील 18 नगरसेवकांनी बंडखोरी करीत कोणार्क विकास आघाडीच्या  पारडय़ात आपले मत टाकले व  सत्तेत सहभाग घेतला होतात्या विरोधात काँग्रेस नगरसेवक व माजी महापौर जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे धाव घेतलीबंडखोरीविरोधात याचिका दाखल करून 18  नगरसेवकांना  पदावरून बडतर्फ करण्याची मागणी केली होतीसर्व बंडखोर नगरसेवकांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहेराष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शोएब खान गुड्डूउपमहापौर इम्रान वली खानमाजी उपमहापौर अहमद सिद्दीकी यांसह नगरसेवकांनी जल्लोष केला.