इंग्रजी शाळेचा अट्टहास कशासाठी? 14 ते 18 वयोगटातील 45 टक्के विद्यार्थ्यांची इंग्रजी वाचनाची बोंब

इंग्रजी शाळेत पाल्याच्या प्रवेशासाठी आग्रही असणाया पालकांच्या डोळ्यात अंजन घालन्याचे काम यंदा जाहीर झालेल्या असर 2023 या शैक्षणिक सर्वेने केले आहे. या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार 14 ते 18 वर्षे वयोगटातील सुमारे 45 टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीचे साधे वाक्य वाचता येत नाही तर 43 टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीचे वाक्य आणि त्याचा अर्थही कळत नाही. स्थानिक भाषेतही 25 टक्के विद्यार्थी मागे आहेत त्यांना आपल्या स्थानिक भाषेतील साधे वाचनही करता येत नाही.

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन आणि असर सेंटरने यंदा ग्रामीण भागातील 14 ते 18 वयोगतील विद्याथ्र्यांचे सर्वेक्षण केले. 24 राज्यातील 26 ग्रामीण जिह्यातील सुमारे 34,745 विद्यार्थ्यांनी या सर्वे मध्ये भाग घेतला. देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरनानुसार 14-18 वयोगटातील विद्यार्थ्यांना सक्तीचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असताना, या गटातील एक चतुर्थांश ग्रामीण तरुणांना साधा मजकूर वाचता येत नाही, तर अर्ध्याहून अधिक मूलभूत अंकगणिताच्या समस्या सोडवू शकत नाहीत, असेही या अहवालातून समोर आले आहे.

 14 ते 18 वयोगटातील बहुतांश ग्रामीण किशोरवयीन मुले औपचारिक शिक्षण व्यवस्थेचा भाग आहेत, परंतु त्यांच्यापैकी अनेकांकडे मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक काwशल्ये आणि त्यांच्यात शिक्षणाचा दैनंदिन परिस्थितीत वापर करण्याची क्षमता नाही.  एक चतुर्थांशहून अधिक विद्यार्थ्यांनी सांगितले की स्मार्ट पह्नचा वापर हा ऑनलाईन सेवा खरेदी-विक्री बिले भरणे तिकीट बुक करणे यासाठी केला जातो.  14-18 वयोगटात शाळाबाह्य तरुणांचे प्रमाण 14.4% इतके आहे.  सर्वेक्षण केलेल्या तरुणांपैकी केवळ 5.6 टक्के सध्या व्यावसायिक प्रशिक्षण किंवा इतर संबंधित अभ्यासक्रम घेत आहेत.  आपल्या भाषा विषयांमध्ये 76 टक्के मुली चांगले वाचन करतात तर मुलांची संख्या मात्र यासाठी केवळ 70. 9 टक्के आहे.  अध्याहूना अधिक विद्यार्थ्यांना सेंटीमीटर लांबी रुंदी याची देखील माहिती नीट देता येत नाही.  57 टक्के विद्यार्थी अंक गणिताचे साधी उत्तरही देऊ शकले नाहीत.

डिजिटलचा वापर वाढला

14 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक करत असून यामध्ये 90.5टक्के इतकी संख्या आहे यात मुली 87.8टक्के तर मुलांची संख्या त्याहून अधिक 93.4 टक्के इतकी आहे. मुलांमध्ये सोशल मीडिया आणि त्या संदर्भातील सेटिंग संदर्भात सर्वाधिक माहिती घेताना दिसतात तर वाचनाने आपल्या अभ्यासक्रमा संदर्भात दोन तृतीयांश विद्यार्थ्यांनी आपल्या स्मार्टपह्नचा वापर केला आहे.