Nagar: विहिरीत पडलेल्या मांजराला वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा मृत्यू

अहिल्यानगरमध्ये एका पडक्या विहिरीतून मांजर वाचवण्याच्या नादात पाच जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, एका पडक्या विहिरीचा वापर बायोगॅसनिर्मितीसाठीचा खड्डा म्हणून केला जात होता.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात पाच जणांनी एकामागून एक विहिरीत उडी घेतली. कमरेला दोरी बांधून विहिरीत उतरलेल्या एका व्यक्तीला पोलिसांच्या पथकानं वाचवलं. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं.

या घटनेबाबत भाष्य करताना, वरिष्ठ पोलीस अधिकारी धनंजय जाधव म्हणाले, ‘बचाव करणाऱ्यांनी पडक्या विहिरीत एकामागून एक उडी मारलेल्या सहापैकी पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले’.

‘विहिरीत मोठ्याप्रमाणात प्राण्यांच्या शेणाचा कचरा साठला होता’, अशी माहिती त्यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितलं.

नेवासा तालुक्यातील वाकडी या गावात येथील एका शेतकऱ्याने बायोगॅससाठी जुन्या विहरीचा वापर केला होता. त्या विहरीत शेनाची स्लरी तयार करण्यात आली होती. सदर विहरीत एक मांजर पडले म्हणून एक मुलगा काढण्यास गेला असता तो बुडाला त्या मुलाला काढण्याकरता दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असे सहा लोक उतरले होते त्यातील पाच लोकांचा जागेवर गुदमरून मृत्यू झाला, असल्याची माहिती असून सहावा इसम विजय माणिक काळे बेशुद्ध अवस्थेत नगर येथे रुग्णालयात उपचासरासाठी दाखल केला आहे. ही घटना सायंकाळी 5 च्या दरम्यान घडली

बुडालेल्या व्यक्तींची नावे माणिकराव गोविंद काळे, वय-65 , संदीप माणिक काळे-36 वर्ष, अनिल बापूराव काळे-58 वर्ष, विशाल अनिल काळे-23 वर्ष, बाबासाहेब पवार-35 वर्ष
जनावराच्या शेणाचा शोषखड्डा विहिरीमध्ये बनवला गेला होता. त्यामध्ये हे सहा जण अडकले असून त्यांना काढण्याची रेस्क्यू ऑपरेशन वाकडी येथे सुरू असून याप्रसंगी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, तहसीलदार संजय बिरादार घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यास सांगितले असून या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचणार आहे.