54 पैकी 51 आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा दिला होता प्रस्ताव, प्रफुल्ल पटेलांचा दावा

महाविकास आघाडीवर मिंध्यांच्या गद्दारीचे संकट घोंघावत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 पैकी 51 आमदारांनी भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता असं बंडखोर प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. या संदर्भात आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पत्रही दिलं होतं असा दावा त्यांनी केला आहे. या सगळ्या घडामोडी एक वर्षापूर्वी घडल्या होत्या असं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसने वेळेत निर्णय घेतला नाही आणि मिंध्यांनी ती संधी साधली आणि सत्ता स्थापन केली असं पटेलांचं म्हणणं आहे. भाजपसोबत जाण्याचा विचार 2022 मध्येच सुरू झाला होता असंही ते म्हणाले. फक्त आमदारच नाही तर सर्वसाधारण कार्यकर्ते, नेते यांनाही आपण भाजपसोबत जावं असं वाटत होतं असा दावा पटेल यांनी केला आहे.

राष्ट्रवादीत संघर्षाचा वणवा

भाजपची कुटील नीती आणि पक्षातील बंडखोभाजपची कुटील नीती आणि पक्षातील बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुनःश्च हरिओम करीत प्रचंड उत्साहात मैदानात उतरले आहेत. कराडच्या प्रीतीसंगमावर आज शरद पवार यांनी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आपले राजकीय गुरू स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रणशिंग फुंकले. यावेळी हजारो समर्थकांची गर्दी उसळली. ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ हा विश्वास शरद पवारांना देण्यासाठी भरपावसात जनता रस्त्यावर उतरल्याचे चित्र सातारा, कराड दौऱ्यात दिसले. यावेळी शरद पवार यांनी ‘अजित पवार म्हणजे पक्ष नाही’ असे स्पष्टपणे सुनावतानाच महाराष्ट्र पिंजून काढू आणि नव्या कार्यकर्त्यांना संधी देत महाराष्ट्राचे चित्र पालटून दाखवू, असा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, पक्ष, चिन्हासाठी अजित पवार गट आणि राष्ट्रवादीमध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

भुजबळ, तटकरे, वळसे-पाटील, पटेल यांचा विषय दोन शब्दांत संपवला

छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ही विश्वासू मंडळी तुम्हाला सोडून गेल्याचे दुःख वाटते का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच शरद पवार यांनी अजिबात नाही! मला दुःख वाटत नाही, असा दोन शब्दांत विषय संपवला. ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादीत फूट पडली असे मी म्हणणार नाही. माझे सहकारी मला सोडून गेले. या अवघड परिस्थितीचा मला जुना अनुभव आहे. एवढय़ा संकटातही आपण इतके कॉन्फिडंट असताना सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यात अस्वस्थता दिसते? असा प्रश्न विचारला असता, तुम्ही चिंता करू नका, पक्षाचा नेता इतका कॉन्फिडंट असेल तर बाकीची सेना रिचार्ज व्हायला वेळ लागत नाही, असे पवार यांनी सांगितले.