नको अटी, नको शर्ती, हवी कर्जमुक्ती; मराठवाड्यात आज शिवसेनेची बळीराजा गर्जना टॅक्टर रॅली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘नको अटी, नको शर्ती…आम्हाला पाहिजे कर्जमुक्ती’, असा निर्धार करत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरणार आहे. शिवसेनेची बळीराजा गर्जना

ट्रक्टर रॅली छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. सकाळी 10 वाजता क्रांतीचौक येथून ही रॅली निघेल. मराठवाड्यातील प्रत्येक जिह्यात हे आंदोलन होईल.

शेतकरी अनेक संकटांच्या गर्तेत सापडलेला आहे. त्यात सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र त्यात जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. त्याला शिवसेनेचा विरोध आहे. विनाअट शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफीची शिवसेनेची मागणी असून त्यासाठीच मराठवाडाव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्य रॅली छत्रपती संभाजीनगरात निघणार असून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रक्टर रॅलीद्वारे धडक देण्यात येणार आहे.

शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजकतेखाली ही रॅली काढली जाणार असून, छत्रपती संभाजीनगर येथील रॅलीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते सुभाष पाटील तसेच मोठय़ा प्रमाणात शेतकरीही सहभागी होणार आहेत.