
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 28 जून रोजी आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) महिला उमेदवारांना हिजाब, बुरखा व दुपट्टा वापरण्यास बंदी घातली आहे. परीक्षा केंद्रांवरील सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसी टीव्ही निरीक्षण व्यवस्था असल्याने परीक्षार्थ्यांचा संपूर्ण चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक आहे. त्यामुळे वर्गखोलीमध्ये मानेच्या वरच्या भागावर, म्हणजे डोक्यावर, कानांवर, तोंडावर किंवा चेहऱयावर कोणत्याही प्रकारचे कपडे अथवा आवरण ठेवता येणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.






























































