
भारतीय जनता पक्ष आणि प्रशासनाचा दुरान्वयेही संबंध नाही. सरकारला जनतेच्या, युवकांच्या प्राणाची किंमत नाही. आपले म्हणणे रेटून नेणे म्हणजे सरकार चालवणे नाही. याला हुकुशाही म्हणतात, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या लुटीविरोधात हिंदू जागृतीसाठी शिवसेनेने मुंबईतून रामरक्षा आंदोलनाची ठिणगी पेटवली. या राज्यव्यापी आंदोलनाचा पुढचा टप्पा उद्या उपराजधानी नागपुरातून सुरू होत आहे. नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. आंदोलनासाठी उद्धव ठाकरे नागपूर येथे दाखल झाले. यावेळी नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईवरून भाजप सरकारवर हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे म्हणाले, सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी असेल तर यापूर्वीत त्यांच्याशी नीट बोलण्याची आवश्यकता होती. सरकारची ही कृती खूपच निंदनीय आहे. हे सरकार नीटची परीक्षा बरोबर घेऊ शकत नाही. भाजपचा आणि प्रशासनाचा दुरान्वयेही संबंध नाही. हे आंदोलनही नीट हाताळू शकत नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असे काय आहे आणि अजून किती बळी घेतल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाणार हे सरकारने जाहीर करावे.
सोनम वांगचुक हे स्वत:च्या प्राणाची आहुती द्यायला तयार झालेले आहेत. आता काही मुलं सुद्धा उपोषणाला बसलेली आहेत. यापूर्वी नीट परीक्षेच्या पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. एवढ्या आत्महत्या होऊनही आणि युवा शक्ती वाया जात असतानाही सरकार धर्मेंद्र प्रधान यांच्या चुकांवर पांधरूण घालत आहे. त्यांना काय सोने लागलंय का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतले असून कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी असा दावा केला असेल तर वांगचुक यांनी उचलून रुग्णालयात टाका अशी कोर्ट ऑर्डर दाखवा, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले. कोर्टाने वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. यापूर्वी देखील अनेक उपोषणं झालेली आहेत. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही उपोषणं केली. चर्चा केल्यानंतर उपोषण सोडले जाते. अण्णा हजारे यांच्या बाबतीत काँग्रेसच्या सरकार असताना चर्चा करून उपोषण सोडले गेले. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने त्यांच्याबरोबर चर्चा करावी आणि उपोषण सोडवावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी सोनम वांगचूक यांना अटक, संजय राऊत यांची टीका
20 तारखेला संसदेवर मोर्चा निघणार होता आणि याच दिवशी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. तत्पूर्वी वांगचुक यांना जबरदस्ती रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांनी हा मोर्चा निघायला हवा असे म्हटले.
Sonam Wangchuk – “20 दिवस बघ्याची भूमिका घेतली, आता आवाक्याबाहेर गेल्याचं लक्षात येताच…”, शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा
वाचा सविस्तर – https://t.co/H4uhT4EeAL pic.twitter.com/UtWDjzS2wC— Saamana Online (@SaamanaOnline) July 18, 2026


























































