
>> नीलिमा प्रधान
मेष – प्रकृतीची काळजी घ्या
मंगळ, बुध राश्यांतर. सप्ताहाच्या सुरुवातीला मनावर दडपण राहील. प्रकृतीची काळजी घ्या. फसगत टाळा. नोकरीत तडजोडीचे धोरण ठेवा. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ रहा. गैरसमज टाळा. शुभ दि. 6, 7
वृषभ – कार्याला कलाटणी मिळेल
मंगळ, बुध राश्यांतर. कार्याला योग्य कलाटणी देणारे ठरेल. आळस न करता मेहनत घ्या. ध्येय गाठा. नोकरीत स्थान मजबूत करा. धंद्यात वाढ होईल. किरकोळ खर्च होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना महत्त्व द्या. शुभ दि. 2, 3
मिथुन – संयमी भाषा यशदायी
मंगळ, बुध राश्यांतर. उत्साह, आत्मविश्वास वाढवणारे ठरेल. संयमी भाषा यश देईल. तुमचे महत्त्व वाढेल. नोकरीत परदेशी जाण्याचे योग. धंद्यात धावपळ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार व प्रतिष्ठा लाभेल. शुभ दि. 2, 3
कर्क – तणाव वाढवू नका
मंगळ, बुध राश्यांतर. तुमच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी शोधता येईल. अनेकांचे सहकार्य मिळवाल.तणाव वाढवू नका. मैत्रीचा योग्य वापर करा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ध्येय गाठा. कायदा पाळा. शुभ दि. 3, 4
सिंह – कामात सतर्क रहा
मंगळ, बुध राश्यांतर. क्षेत्र कोणतेही असो कुणालाही कमी लेखू नका. संयम, सहनशीलता ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाची कागदपत्रे जपा. कोर्ट संबंधातील कामात सतर्क रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ रहा. नोकरी टिकवा. शुभ दि. 3, 4
कन्या – यश संपादन कराल
मंगळ, बुध राश्यांतर. अनेक व्यक्तींचे सहकार्य लाभेल. कामात यश संपादन कराल. नवीन परिचय महत्त्वाचा ठरेल. नोकरीत सुधारणा होईल. योजना मार्गी लावा. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर कौतुक होईल. शुभ दि. 3, 4
तूळ – सहनशीलता ठेवा
मंगळ, बुध राश्यांतर. शारीरिक, मानसिक दडपण येईल. गैरसमज, तणाव जाणवेल. सहनशीलता ठेवा. महत्त्वाच्या वस्तू जपा. दूरदृष्टिकोन ठेवून वागा. नोकरीच्या कामात चूक टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया होतील. शुभ दि. 5, 6
वृश्चिक – संयमी कृती करा
मंगळ, बुध राश्यांतर. बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून कठीण प्रश्न मार्गी लावता येईल. संयमी कृती करा. तणाव वाढवू नका. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात वाढ तरीही चिंता सतावेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर गाजावाजा होईल. शुभ दि. 3, 4
धनु – कागदपत्रांची काळजी घ्या
मंगळ, बुध राश्यांतर. प्रकृतीची काळजी घ्या. दुखापत टाळा. महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्या. कुणावरही विश्वास ठेवू नका. नोकरी टिकवा. धंद्यात चर्चेत चूक टाळा. कराराची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायदा पाळा. शुभ दि. 2, 3
मकर – मुद्दे प्रभावी ठरतील
मंगळ, बुध राश्यांतर. कुणालाही कमी लेखू नका. दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल. मुद्दे प्रभावी ठरतील. विरोधक मैत्रीची भाषा करतील. तुमचे सहकार्य हवेहवेसे वाटेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता, प्रतिष्ठा वाढेल. शुभ दि. 2, 3
कुंभ – चौफेर सावध रहा
मंगळ, बुध राश्यांतर. आत्मविश्वास, उत्साह वाढेल. नियंत्रण ठेवा. कोणतेही भाष्य करताना चौफेर सावध रहा. धंद्यात नम्र रहा. सतर्क रहा. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तारेवरची कसरत होईल. कायदा पाळा. शुभ दि. 2, 3
मीन – कामाची प्रशंसा होईल
मंगळ, बुध राश्यांतर. तुमच्या क्षेत्रात प्रगतीचा, उत्कर्षाचा नवा मार्ग सापडेल. महत्त्वाची कामे करा. नोकरीधंद्यात जम बसेल. कामाची प्रशंसा होईल. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संयमाने वागा. दुखापत टाळा. शुभ दि. 3, 4



























































