‘जन नायगन’चा परदेशात डंका, 11 दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

‘जन नायगन’ हा तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपथी विजय यांचा शेवटचा चित्रपट आहे. हा राजकीय ॲक्शन ड्रामा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारपेठांमध्ये ताबडतोड कमाई करताना दिसत आहे. विशेषतः परदेशी बाजारपेठेत, ‘जन नायगन’ला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे परदेशात एक महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित झाला आहे. ‘जन नायकन’ प्रदर्शनापूर्वीच ऑनलाइन लीक झाला होता आणि त्यानंतर CBFC कडील प्रमाणपत्राच्या समस्यांमुळे त्याला मोठ्या विलंबाला सामोरे जावे लागले होते. पहिल्याच दिवशी चित्रपटाने जोरदार कमाई करत ₹42.70 कोटी कमावले.

एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार, विजयच्या निष्ठावान चाहत्यांनी या चित्रपटाला चांगलीच पसंती दर्शवली आहे. यामुळे या चित्रपटाने ‘करुप्पू’ला (₹81.15 कोटी) सहज मागे टाकत परदेशी बाजारपेठेत 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा कॉलीवूड चित्रपट बनण्याचा मान मिळवला.

चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, प्रदर्शनाच्या 11 व्या दिवशी ‘जन नायकन’ने हिंदुस्थानात 4 हजार 321 शोजमधून ₹10.70 कोटींची निव्वळ कमाई केली. यामुळे हिंदुस्थानातील चित्रपटाचे एकूण कलेक्शन ₹204.92 कोटी झाले आहे. परदेशात चित्रपटाची 11 दिवसातील एकूण कमाई ही ₹91 कोटी झालेली आहे. यामुळे, ‘जन नायकन’ची जगभरातील कमाई ₹295.92 कोटींवर पोहोचली आहे.

91 कोटी रुपयांची कमाई करून, ‘जन नायकन’ने ‘वाजा 2’ (85.75 कोटी रुपये) ला मागे टाकले आहे आणि 2026 मध्ये परदेशातील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या तिसऱ्या हिंदुस्थानी चित्रपटाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.