चाकण-हिंजवडीच्या 1800 कोटींच्या आराखड्याला मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चाकणमधील रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पावसाळी पाणी निचरा व्यवस्थापन आदींच्या सुधारणेसाठी 1 हजार 400 कोटी रुपयांच्या आराखड्यास तसेच हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रस्तावित 426 कोटी रुपयांच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तत्त्वतः मंजुरी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या बैठकीत आराखडय़ाचे सादरीकरण करण्यात आले. चाकण आणि हिंजवडीतील प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी डिसेंबरपासून कामे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे  पुढील पावसाळ्यापूर्वी चाकणमधील वाहतूक आणि पाणी निचऱयाच्या समस्यांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखडय़ाचे सादरीकरण करताना दिली.