सीएसएमटी स्थानकात 75 दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, लांब पल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्लॅटफॉर्म पुनर्विकास आणि विस्तारीकरणाच्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 तसेच स्टेब्लिंग लाइन 15 वर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिनांक 1 ऑक्टोबर 2026 ते 15 डिसेंबर 2026 या कालावधीत 75 दिवसांचा ब्लॉक आयोजित केला आहे. या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 होणारी रेल्वे वाहतूक बंद राहिल. त्यानंतर हे प्लॅटफॉर्म वाहतूक कार्यासाठी आरएलडीए कडून रेल्वेला हस्तांतरित केले जाईल.

ब्लॉक कालावधीत 1 ऑक्टोबर 2026 पासून काम पूर्ण होईपर्यंत अप दिशेच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांची सेवा दादर किंवा ठाणे येथेच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

  • गाडी क्रमांक 11002 बल्लारशाह – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12112 अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 22120 मडगांव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 22144 बिदर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 22108 लातूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

  • गाडी क्रमांक 12134 मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस