
>> प्रा. गौतम बिस्वास
विद्यापीठे किंवा संस्थांमधील काही विद्यार्थी विशेष संवेदनशील गटात मोडतात. उच्च शिक्षण घेत असताना त्यांच्यावर शैक्षणिक दबाव, आर्थिक ताण, सामाजिक वातावरणाशी जुळवून घेण्यात येणाऱ्या अडचणी, आयुष्यातील स्थित्यंतरे, विविध आव्हाने आणि मैत्रीसंबंधांतील समस्या यांचा भार जाणवतो. गेल्या काही वर्षांत ही आव्हाने कशी बदलत गेली आहेत यावर एक नजर टाकूया.
आयआयटीच्या बाहेर त्यांच्याकडे अत्यंत आदराने पाहिले जाते. सामाजिकदृष्टय़ा विशेषाधिकारप्राप्त गट मानला जात असूनही काही विद्यार्थ्यांना वैयक्तिक आयुष्यात नैराश्याचा सामना करावा लागतो. त्यामागील काही कारणे-
अपुरी शैक्षणिक कामगिरी : काही विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस कमी होतो आणि त्यांच्यापैकी काही जण अनिष्ट कृती आणि सवयींकडे वळतात. वसतिगृहातील राहणीमान : वसतिगृहांमधील राहणीमानाशी संबंधित समस्यांबाबत काही विद्यार्थी आणि प्राध्यापक चिंतेत आहेत.
नियमित अभ्यासाची सवय सुटणे : काही विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासाची सवय सुटणे ही सामान्य बाब आहे. मानसिक थकवा, स्पष्ट उद्दिष्टांचा अभाव, डिजिटल माध्यमांमुळे लक्ष विचलित होणे किंवा अभ्यासाचा प्रचंड भार ही त्यामागील कारणे असू शकतात. अभ्यास हा दैनंदिन दिपामाचा भाग राहिला नाही की काम पुढे ढकलण्याची सवय वाढते. त्यामुळे पुन्हा शिस्तबद्ध दिपामाकडे वळणे आणखी कठीण होते.
वरील समस्या या संपूर्ण आयआयटी व्यवस्थेतील सर्वसाधारण समस्या आहेत. अनेक विद्यापीठांनाही या समस्यांचा सामना करावा लागत आहे. आपण या समस्यांना थेट सामोरे गेले पाहिजे आणि सर्वसाधारणपणे स्वीकारता येतील असे उपाय शोधले पाहिजेत. सध्या राबवल्या जाणाऱया काही उपाययोजनांचा चांगला परिणाम झाला आहे; मात्र त्या पूर्णपणे पुरेशा नाहीत. आपल्याला त्यापुढे जावे लागेल. मुख्य म्हणजे समुपदेशन सेवा अधिक प्रभावी आणि सािढय करावी लागेल. संस्थेत नव्याने येणाऱया विद्यार्थ्यांचा तेथे व्यतीत होणारा काळ आणि त्यांचे राहणीमान शक्य तितके सुखकर आणि संस्मरणीय करण्याचा प्रयत्न या सेवेमार्फत झाला पाहिजे. त्यामुळे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शक्य तितक्या लवकर या व्यवस्थेशी जुळवून घेता येईल आणि सर्वांगीण वैयक्तिक विकासाबरोबरच शैक्षणिक उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी ते प्रयत्न करू शकतील.
समुपदेशन सेवेमध्ये प्राध्यापक समुपदेशक आणि विद्यार्थी मार्गदर्शकांचा समावेश असलेले अनेक संघ असले पाहिजेत. विद्यार्थ्यांशी जवळचे आणि सहानुभूतीपूर्ण नाते निर्माण करणे ही प्राध्यापक समुपदेशकाची भूमिका असली पाहिजे. विद्यार्थ्यांचा संस्थेतील वास्तव्याचा संपूर्ण काळ आणि त्यानंतरही हे नाते टिकले पाहिजे. काही विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो, काही विद्यार्थ्यांना इतरांच्या तुलनेत शिकणे अधिक कठीण जाते, काहींना सामाजिक समस्या असतात, त्यामध्ये विस्कळीत कुटुंब आणि आर्थिक ताण यांचाही समावेश आहे. या गोष्टी आपण विचारात घेणे आवश्यक आहे.
अनेक विद्यार्थ्यांना संवादाशी संबंधित समस्या असतात. हा केवळ भाषेचा प्रश्न नाही; काहींना स्वतच्या मातृभाषेतही आपल्या कल्पना व्यक्त करण्यात अडचणी येतात. काही विद्यार्थ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. वारंवार आलेल्या अपयशामुळे काहींनी आपला आत्मविश्वास गमावलेला असतो. शिकण्यातील रस गमावलेल्या किंवा अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरणाऱया व्यक्तीला मदत करण्यासाठी प्रशासनाच्या बाजूने विविध प्रकारच्या रणनीती विकसित करण्याची गरज आहे. काही विद्यार्थ्यांना रागिंगला सामोरे जावे लागते. आपल्यापेक्षा कोणत्या ना कोणत्या प्रकारे अधिक शक्तिशाली वाटणाऱया विद्यार्थ्यांकडून सुमारे 10 टक्के विद्यार्थ्यांचे रॅगिंग होत असल्याचा अंदाज आहे.
अशा स्थितीत व्यावसायिक समुपदेशक उपयुक्त ठरतात. माझ्या कार्यकाळात आम्ही आयआयटी गुवाहाटीमध्ये काही उत्कृष्ट व्यावसायिक समुपदेशकांची नियुक्ती केली होती. अनेक संघही स्थापन केले. उदाहरणार्थ, वसतिगृहांतील राहणीमान सुधारण्यासाठी तरुण आणि उत्साही प्राध्यापकांनी महिन्यातून एकदा रविवारी वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसोबत अधूनमधून रात्रीचे जेवण किंवा नाश्ता करावा, यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन दिले. ही व्यवस्था सातत्याने बदलत असते. प्रशासनाच्या या गुंतागुंतीच्या स्वरूपाला हाताळण्यासाठी आपल्याला नवीन रणनीती विकसित कराव्या लागतील. विद्यार्थ्यांच्या पारी आणि गाऱहाणी स्वीकारण्यासाठी कार्यक्षम मार्गही व्यवस्थेने निर्माण केले पाहिजेत. अधिक सहाय्यकारी वातावरण निर्माण करण्यात शैक्षणिक नेतृत्व, प्राध्यापक, समवयस्कांचे जाळे आणि धोरणकर्ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. यातील सर्वांत पहिला मुद्दा म्हणजे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरणाची आवश्यकता आहे. हे वातावरण सकारात्मक, आनंदी आणि विविध उपामांनी भरलेले असले पाहिजे. त्यातून प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या आकांक्षांचे संवर्धन होईल. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे हे सोपे काम नाही. प्रत्येक वेगळ्या विद्यार्थ्याला प्रेरित करण्यासाठी उत्कटता, बांधिलकी आणि सहानुभूतीची आवश्यकता असते. अध्यापन-अध्ययनाच्या अनुभवामध्ये विद्यार्थ्यांना अधिक सािढयपणे सहभागी करून घेण्याचे आणि त्यात त्यांना पूर्णपणे गुंतवून ठेवण्याचे विविध मार्ग आहेत. विद्यार्थ्यांना प्रेरित आणि कार्यरत ठेवण्यासाठी आपल्याला नव्या कल्पना शोधाव्या लागतील, तरच तेथील वातावरण एका गतिमान शैक्षणिक व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करेल आणि अशी व्यवस्था कोणत्याही ‘नकारात्मकते’चा प्रभावीपणे प्रतिकार करू शकेल.
शैक्षणिक उत्कृष्टतेशी तडजोड न करता विद्यार्थ्यांचे कल्याण होण्यासाठी कोणत्या व्यावहारिक सुधारणा करता येतील यासाठी काही सूचना आहेत. या सर्वांची अंमलबजावणी करणे सोपे असेलच असे नाही; मात्र त्यापैकी किमान काहींचा प्रयत्न आपण करू शकतो.
(लेखक बिटस् पिलानीच्या के. के. बिर्ला गोवा कॅम्पसमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे वरिष्ठ प्राध्यापक एमेरिटस आहेत.)


























































