लालकृष्ण अडवाणी यांना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. छातीत संसर्ग झाल्यामुळे १६ ऑक्टोबर रोजी त्यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

९८ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांच्यावर अपोलो रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या प्रकृतीत आता चांगलीच सुधारणा झाली आहे.

अडवाणी यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समोर येताच, देशभरातील राजकीय नेते आणि त्यांच्या हितचिंतकांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली होती.