अज्ञाताचा फोन अन् खात्यातील साडेआठ लाख गेले; सायबर गुन्हेगाराचा वृद्धेला गंडा

वरळी येथे राहणाऱया 70 वर्षीय वृद्धेला सायबर गुन्हेगाराने साडेआठ लाखांना गंडा घातला. बँकेतून बोलत असल्याचे सांगणाऱया त्या भामटय़ाने महिलेचा शिताफीने विश्वास संपादन करून त्यांच्या बचत ठेवीवर डल्ला मारला. याप्रकरणी दादर पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

वरळी परिसरात राहणाऱया काwमुदिनी (नाव बदललेले) यांच्या मोबाईलवर एक कॉल आला आणि कॉलरने त्याची ओळख अमीर राय अशी सांगून तो ऑक्सिस बँकेच्या बीकेसी येथील मुख्यालयातून बोलत असल्याचे म्हणाला. तुमचे बचत खाते बंद झाले असून तुम्हाला ते पुन्हा सुरू करावे लागेल. जर तुम्हाला माझे बोलणे संशयास्पद वाटत असेल तर तुम्ही बीकेसीतील बँकेच्या मुख्यालयात येऊन माहिती घेऊ शकता, असे त्याने सांगितले. मग कौमुदिनी यांच्या नंबरवर येणारे कॉल व संदेश भामटय़ाने त्याच्या मोबाईल नंबरवर वळते करून घेतले. त्यानंतर चार दिवसांनी त्या भामटय़ाने काwमुदिनी यांना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर कॉल केला आणि बँक खात्याची आणखी माहिती मागितली. कौमुदिनी यांनीदेखील तो विचारेल ती माहिती दिली. त्याच्या दोन दिवसांनी काwमुदिनी यांनी त्यांच्या बँकेच्या वरळी शाखेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या बँक खात्यातील बचत ठेव म्हणून ठेवलेले आठ लाख 30 हजार रुपये दुसऱयाच खात्यात वळते झाल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काwमुदिनी यांनी दादर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दिली.