आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मथुरेतील ठाकूर श्यामजी महाराज मंदिराचे लोकार्पण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे सोमवारी मथुरा दौऱ्यावर गेले आहेत. तिथे त्यांच्या हस्ते ठाकूर श्यामजी महाराज मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत सौ. रश्मी ठाकरे या देखील होत्या.

मथुरा येथील ठाकूर श्यामजी महाराज मंदिर हे वैष्णव पंथातील वल्लभ संप्रदायाचे पाचशे वर्ष जुने मंदिर आहे. धार्मिक अध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या पुरातन मंदिराचे खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि नागार्जुन फाउंडेशनचे अल्लुरी यांच्या प्रयत्नाने नुतनीकरण करण्यात आले. या मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी आदित्य ठाकरे हे सोमवारी मथुरा येथे आले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी आज मथुरेत बाँके बिहारी मंदिरात पूजा करून दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी यमुना दर्शन करत नंतर त्यांनी ठाकूर श्यामजी महाराज मंदिराचे उद्घाटन केले.