कायद्याचा धाक ‘इथे’ दाखवा! मुलुंडच्या घटनेवरून आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला टोला

मुंलुंडमधील शिवसदन सोसायटीतील गुजराती लोकांनी त्या सोसायटीत मराठी माणसाला घर किंवा गाळा दिला जात नसल्याचे मुजोरपणे सांगत दादागिरी केली आहे. या दादागिरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. यावरून त्यांनी मिंधे सरकारला देखील फटकारले आहे.

”चीड आणणारी घटना… पण प्रश्न हा आहे, की हे पाहून मिंधे-भाजपा सरकार काय करणार? आमच्या मराठमोळ्या वारकऱ्यांवर, बारसूमधल्या महिलांवर, मराठा समाजावर लाठ्या चालवल्या… तसा इथेही कायद्याचा धाक दाखवणार, की दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून ‘हाताची घडी तोडांवर बोट’ ठेवून गप्प बसणार? या बिल्डींगवर कारवाई होणार का? उद्या महापालिका आणि पोलीस पाठवणार का? की ‘थॅंक यू’ म्हणून बुलेट ट्रेनच्या कामाला वेग देणार? हिम्मत करा! कायद्याचा धाक ‘इथे’ दाखवा! महाराष्ट्र बघतोय! अतिशय संतप्त करणारी ही घटना, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी फटकारले आहे.