आंतरजिल्हा बदलीत हजर न झालेल्या ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई

आंतरजिल्हा बदल्यांमध्ये नगर जिह्यात बदलून आलेल्या 89 शिक्षकांना आठ दिवसांपूर्वी नियुक्त्या दिल्यानंतरही काही शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले नसल्याचे समोर आले आहे. जे शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी हजर होणार नाहीत, त्यांच्यावर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे.

राज्यातील तीन हजार 943 शिक्षकांच्या ऑनलाइन आंतरजिल्हा बदल्या ऑगस्ट 2022मध्ये झाल्या. यात इतर जिह्यांतून 265 शिक्षकांच्या बदल्या नगर जिह्यात झाल्या. विहित मुदतीत केवळ 176 शिक्षक हजर झाले. त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन करून जिह्यात नियुक्त्या दिल्या गेल्या; परंतु 89 शिक्षकांना त्या-त्या जिह्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी कार्यमुक्त केले नव्हते. बदल्यांनंतर शिक्षकांच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त राहत असतील तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी अशा शिक्षकांना कार्यमुक्त करीत नाहीत. असेच हे 89 शिक्षक गेल्या वर्षभरापासून बदली होऊनही अडकले होते. जून 2023मध्ये अशा शिक्षकांना कार्यमुक्त केले गेल्याने ते 89 शिक्षक स्वगृही म्हणजे नगर जिह्यात बदलून आले.

या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून 28 जून रोजी समुपदेशनाने पदस्थापना दिली गेली. यात संवर्ग-1, संवर्ग-2मधील शिक्षकांचाही विचार झाला. जेथे रिक्त जागा असतील, तेथे त्यांना नियुक्ती दिली गेली व दोन दिवसांत नियुक्त शाळेत हजर होण्यास सांगितले. परंतु अजूनही अनेक शिक्षक हजर झालेले नाहीत. त्यामुळे जे शिक्षक वेळेत हजर होणार नाहीत, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त भायखळा मुख्यालय येथे मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत तळेकर, चिटणीस मिलिंद वळंजू, अनिल खराटे, दशरथ घनवट, सल्लागार नारायण केदार उपस्थित होते.