गाळेधारकांना हटवण्यासाठी अदानीची नवी शक्कल, धारावीच्या व्यावसायिकांना 5 वर्षांची एसजीएसटी सवलत

धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीच्या हाती गेल्यापासून धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड ही पंपनी रहिवाशी आणि व्यावसायिकांना हटवण्यासाठी नवनवी शक्कल लढवत आहे. डीआरपीपीलने धारावीतल्या पात्र व्यावसायिकांना 5 वर्षांची एसजीएसटी सवलत देण्याचे आज जाहीर केले. व्यावसायिकांसाठी कोणताही ठोस पारदर्शक पुनर्वसन आराखडा जाहीर न करता पंपनीने व्यावसायिकांना सवलतींचे गाजर दाखवायला सुरुवात केली आहे.

धारावी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असली तरी धारावी हे मोठे औद्योगिक पेंद्र आहे. त्यात व्यावसायिक, औद्योगिक गाळे आणि उद्योगांसह मोठय़ा प्रमाणात रहिवासी वस्ती आहे. 600 एकरच्या धारावीत नेमके किती व्यावसायिक आणि औद्योगिक गाळे आहेत याचे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही.

लघुउद्योजकांचे पुनर्वसन कुठे आणि कसे करणार ते आधी सांगा

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे. स्थानिक लघुउद्योजकांना कुठे आणि किती जागा मिळणार आहे, त्याचबरोबर ज्या ठिकाणी घर आणि दुकान आहे त्याच ठिकाणी घर आणि दुकान देण्याची लघुउद्योजकांची मागणी आहे. त्याबाबत अद्याप कोणतीही भूमिका डीआरपीपीएलने स्पष्ट केलेली नाही. असे असताना केवळ निवडणुकीच्या तोंडावर एसजीएसटी सवलतींचे गाजर दाखवून लघुउद्योजकांना भुलवू पाहत आहे. पण आम्ही भुलणार नाही, घर आणि दुकानाची जागा सोडणार नाही, अशी भूमिका धारावीतील लघुउद्योजकांनी घेतली आहे.

दररोज 10 कोटींची उलाढाल

धारावीत दररोज 10 कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल होते. म्हणजे वर्षाला 1 अब्जपेक्षा जास्त उलाढाल करणारी धारावी ही एक उद्योगनगरी आहे. यात प्लॅस्टिक रिसायकल, लेदर, पुंभारकाम, कपडे आणि इतर छोटे-मोठे उद्योग मिळून 5 हजारांपेक्षा जास्त लघुउद्योग धारावीत आहेत. यातल्या कोणत्या लघुउद्योजकांना अदानी पात्र आणि अपात्र ठरवणार, ते कसे ठरवणार, याची भीती आता लघुउद्योजकांना सतावू लागली आहे.

निविदा अटींनुसार सवलत

धारावीच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी निविदेमधील अटींनुसार आम्ही पात्र व्यावसायिकांना एसजीएसटी सवलत देणार आहोत. रहिवाशी प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच ही सवलत लागू होईल, असे डीआरपीपीएलने आज जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. धारावीला व्यावसायिक आणि औद्योगिक परिसर असलेल्या जगाशी जोडलेले शहर बनवण्याचा तसेच येथील उद्योजकीय संस्कृती कायम ठेवतानाच धारावीकरांचे जीवनमान उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा दावा पंपनीने केला आहे.