Plane Crashed- राजस्थानच्या जेसलमेरमध्ये मोठी दुर्घटना, हवाई दलाचे टोही विमान कोसळले

राजस्थानच्या जेसलमेर येथे मोठी विमान दुर्घटना घडली आहे. येथील पिथला गावात गुरूवारी सकाळी हवाई दलाचे टोही विमान कोसळून मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.  जिल्हा प्रशासन आणि वायूसेना अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. हे विमान शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्याचे काम करतं.

हवाई दलाचे हे विमान गुरुवारी सकाळी 10 वाजून 20 मिनीटांनी पिथला गावात विमान कोसळल्याची घटना घडली आहे.  धमाक्याचा मोठा आवाज ऐकून ग्रामस्थांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच हवाई दलाचे आधिकारी घटनास्थळी पोहोचले. हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सुरक्षेच्या कारणास्थव संपूर्ण परिसर बंद केला होता. विमान कोसळताच विमानाला जबरदस्त आग लागली. सध्या अग्निशमन दलाने विमानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र या आगीत विमान पूर्णपणे जळून राख झाले आहे.  तांत्रिक बिघाडामुळे हा विमान अपघात झाला आहे.

हवाई दलाच्या टोही विमानात कोणी वैमानिक नव्हता, हे विमान रिमोटवर ऑपरेट केले जाते. सीमेच्या परिसरातील शत्रूंच्या हालचालीवर नजर राखण्याचे काम हे विमान करतं. जेसलमेरमध्ये पिथला गावाजवळ मोठ्या धमाक्याचा आवाजासह हे विमान कोसळले. मोठा आवाज ऐकून ग्रामस्थ आवाजाच्या दिशेने आले विमान कोसळल्याच्या ठिकाणी पोहोचले. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.