सत्तेत सहभागी झालेले असे ‘दादा’गिरी करतात, अजित पवार गटाचा तो व्हिडीओ शेअर करत वडेट्टीवारांची टीका

सध्य़ा सोशल मीडियावर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मनसे कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत अजित पवार गटाला फटकारले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या ट्विटममधून त्यांना या कार्यकर्त्यांने अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे पोस्टर फाडल्याने त्याला मारहाण करण्यात आली आहे. ”अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे पोस्टर फाडले म्हणून मनसे कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहे. सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाचे नेते असे ‘दादा ‘ गिरी करतात आणि कारवाई होत नाही. सत्ताधारी नेत्यांना दादागिरी करण्याचे, कायदा हातात घेण्याचे लायसन्स सरकारने दिले आहे का?”, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.