इंजिनीयरिंगच्या दुसऱया फेरीत 1 लाख 16 हजार प्रवेश

प्रथम वर्ष इंजिनीयरिंगच्या दुसऱया प्रवेश फेरीतील अलॉटमेंट यादी जाहीर झाली असून यादीत 1 लाख 16 हजार 413 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. या यादीसाठी 1 लाख 32 हजार 805 विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरले होते. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश कर्न्फम करायचे आहेत. दरम्यान, 12 ऑगस्टला तिसऱया प्रवेशाची यादी जाहीर होणार आहे.

ऑप्शन फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी 26 हजार 579 विद्यार्थ्यांना अजूनही कॉलेज अलॉट झालेले नाही. या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाचा एक पॅप राऊंडचीच संधी आहे. राज्यात प्रथम वर्ष इंजिनीयरिंग प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या 1 लाख 42 हजार जागांसाठी 1 लाख 55 हजार 387 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा पहिला पॅप राउंडमध्ये 24 हजार 768 विद्यार्थ्यांनी प्रवेश कर्न्फम केले आहेत. तर 66 हजार 643 विद्यार्थ्यांनी बेटमेंटची संधी घेतली होती. तर दुसऱया फेरीसाठी 1 लाख 32 हजार 805 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले होते. यापैकी 1 लाख 16 हजार 413 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.