अमरावतीत कमानीवर वाद पेटला; आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक

अंजनगावसुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमने-सामने आले. त्यामुळे वाद पेटला आणि गावातीलव संचारबंदी झुगारून हजारो आंदोलकांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. तसेच दंगल नियंत्रण पथकाला घटनास्थळी बोलवावे लागले. या पथकाने तीव्र पाण्याचा मारा केला.

न्याय मिळाला नाही तर थेट मुंबई गाठू, अशी भूमिका घेत आंदोलकांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. आयुक्तांनी तीन दिवसांचा अवधी मागितल्याने आंदोलकांनी आयुक्त कार्यालयासमोरच ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. दुपारच्या सुमारास चर्चा निष्फळ ठरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली, पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यातच आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. काही क्षणातच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून खानापूर गावच्या प्रवेशद्वाराचा वाद सुरु आहे. यावरून स्थानिकांनी तीव्र आंदोलन छेडल्यानंतर पोलिसांनी या भागात संचारबंदी लागू केली होती. परंतु, या प्रकरणी कोणताही तोडगा न निघाल्याने संचारबंदी झुगारूनल हजारो आंदोलक आज अमरावतीत धडकले.

पालकमंत्र्यांनी तोडगा काढल्याचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार दोनच दिवसांपुर्वी याच मुद्दय़ावर येथील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेऊन तोडगा काढल्याचा दावा केला जात आहे. तसेय याप्रकरणी चौकशीचे आदेशही त्यांनी दिले होते. मात्र, अचानक विभागीय आयुक्त कार्यालय पोलीस आणि आंदोलकांमध्ये वातावरण चिघळले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या, लाठीचार्ज आणि पाण्याचा मारा केला. यावेळी काही आंदोलकांनी पोलीस वाहनांची तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि पोलीस दलाचे जवान मोठय़ा संख्येने तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसराला अक्षरशŠ छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.