निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा, 21 लाखांचे बक्षीस जिंका! अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्योतिषांना आव्हान

विविध स्तरांवरील निनडणूक निकालांचे भाकीत प्रत्येक निनडणुकीकेळी ज्योतिषी नर्तकीत असतात. त्याला राजकीय नेतेदेखील बळी पडतात. त्यांच्या या कृतीमुळे गैरसमज पसरतात आणि अंधश्रद्धा निर्माण होतात. यामुळे लोकसभा निकडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तकून 21 लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देशातील ज्योतिषांना आव्हान देण्यात आले आहे. डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मिलिंद देशमुख, प्रकाश घादगिने, किनोद कायंगणकर, प्रकीण देशमुख यांनी या पत्रकाद्वारे त्यासाठीची आकाहन प्रक्रिया, प्रश्नाकली महाराष्ट्र ‘अंनिस’ने जाहीर केली आहे.

हे आव्हान राजकीय अंदाज वर्तविणाऱया राजकीय अभ्यासकांना नाही, तर ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे. 2024च्या लोकसभा निकडणुकीसाठीही ‘अंनिस’मार्फत आव्हान प्रक्रिया लोकप्रबोधनाचा हेतू नजरेसमोर ठेवून राबविली जात आहे. जे ज्योतिषी या आव्हान प्रक्रियेत सहभागी होतील. त्यांना समितीमार्फत एक प्रश्नावली दिली जाईल. या प्रश्नावलीमध्ये ‘अंनिस’ने ज्योतिषांना काही प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये नमुन्यादाखल निवडलेल्या उमेदवारांना किती मते मिळतील? व इतर अनेक प्रश्नांचा समावेश आहे. याचबरोबर त्यासाठी कोणती ज्योतिषपद्धती वापरली, याची माहिती देणेही आकश्यक आहे. प्रश्न आणि उपप्रश्नांसाठी गुणपद्धतही ठरविण्यात आली आहे.

यात सहभागी होण्यासाठी पाच हजार रुपयांचे प्रवेशशुल्क असून, त्यासाठी डीडी सीलबंद पाकिटातून 25 एप्रिलपर्यंत रजिस्टर पोस्टाने कार्तिक अपार्टमेंट, एफ 4, सहारा चौक, संजयनगर, सांगली – 416416. फोन नंबर 0233-2312512 या पत्त्यावर मिळणे बंधनकारक असल्याचेही पत्रकात नमूद केले आहे.