एकेरी उल्लेख करण्याची सवय पडली होती भारी, विराट कोहलीच्या बहिणीने केली होती धुलाई

सोशल मीडियावर सध्या हिंदुस्थानचा स्टार खेळाडू विराट कोहली याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आपली मोठी बहिण भावना कोहली धींगरा हिच्यासोबतची गमतीदार आठवण सांगितली. त्याला त्याच्या मोठ्या बहिणीला एकेरी उल्लेख करत बोलायची सवय होती. मात्र त्याच्या त्या सवयीमुळे एकदा बहिणीचा संयम सुटला आणि तिने त्याला बेदम मारले होते. तेव्हापासून ‘तू’ हा शब्दच नाहीसा झाला आणि ‘आप’ शब्द आला. तेव्हापासूनच आप कैसे हो, आप क्या कर रहे हो हे सुरु झाले.

विराट कोहली यांनी एका मुलाखतीत आपल्या मोठ्या बहिणीबाबतची गमतीदार आठवण सांगितली. त्याला त्याच्या मोठ्या बहिणीला तू बोलायची सवय होती आणि ती त्याला सवयच लागली होती. मात्र त्याच सवईमुळे त्याची चांगली धुलाई झाली होती. पुढे तो म्हणाला माझ्या बहिणीला मला बेदम मारले होते. मी कायम तू करुन बोलायचो, माहित नाही पण एकदा दीदीला इतका राग आला आणि ती मला बेदम मारले. तेव्हापासून तू हा शब्दच बंद झाला आणि आप शब्द आला. तेव्हापासूनच आप कैसे हो, आप क्या कर रहे हो हे सुरु झाले.

विराटने पुढे आणखी एक मजेदार घटना सांगितली, मी कोणाच्या लग्नसमारंभात वगैरे गेलो की अनेकदा लोकं नोटा उडवताना पाहायचो. किती मजा येत असेल लोकांना असा विचार करायचो. कोणीतरी घरी आले होते. त्यांनी 50 रुपये देऊन सामान आणायला सांगितले होते. ते 50 रुपये बघून इतका आनंद झाला की त्या 50 रुपयांचे छोटे छोटे तुकडे केले. घरापासून दूर गेलो, पायऱ्या उतरून गेलो, जे मी जाऊन विखुरले, मोठे तुकडे उडून गेले, मी नाचलो. त्याखाली मी गेलो, सामानही घेतले नाही.” विराट कोहलीचे हे व्हिडीओ बरेच जुने आहेत, जे अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.