Photo – विराट कोहलीचे सासरे आहेत रिटायर्ड आर्मी ऑफिसर, कारगिल युद्धही लढले

अनुष्का शर्मा ही बॉलिवूडची एक अतिशय सुंदर अभिनेत्री आहे. अनुष्का शर्मा लष्करी कौटुंबिक पार्श्वभूमीशी संबंधित आहे. अनुष्काचे वडील अजय कुमार शर्मा हे हिंदुस्थान सैन्यात कर्नल होते.

अनुष्का शर्माने एकदा सांगितले होते की, तिचे वडील 1982 पासून हिंदुस्थान लष्कराच्या वतीने प्रत्येक युद्धात सहभागी झाले आहेत. ऑपरेशन ब्लू स्टार असो की कारगिल युद्ध-अनुष्का शर्माचे वडील कर्नल (निवृत्त) अजय कुमार शर्मा या दोन्हीमध्ये उपस्थित होते. त्यांनी आपले कर्तव्य बजावले.

अभिनेत्री अवघ्या 11 वर्षांची होती जेव्हा तिचे वडील जम्मू-काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात पाकिस्तानविरुद्ध युद्ध लढण्यासाठी गेले होते.

वडील आर्मीत असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या अनुष्काने एकदा सांगितले की, “मी अभिनेत्री असण्यापेक्षाही मी आर्मी ऑफिसरची मुलगी आहे हे सांगण्याचा मला अभिमान वाटतो. मी माझ्या वडिलांच्या खूप जवळ आहे, मी माझ्या वडिलांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते.