ऍपलने एआयवर घातली बंदी

 

ऍपलने अशा एआय म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजेंट ऍपवर बंदी घातल्याचे जाहीर केले आहे. सरकारने एआयचा चुकीचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यामुळे आता ऍपलनेही अशा ऍप्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. न्यूड फोटो तयार करण्यासाठी या ऍप्सचा वापर करण्यात येत होता. या ऍप्सच्या माध्यमातून फोटोतून कपडे हटवण्यात येत होती. ही ऍप्स मोफत सेवा देत होती. अशी  3 ऍप्स ऍपलने आपल्या ऍप स्टोरमधून हटवली आहेत.