एरिस अॅग्रोमधील कामगारांना वेतनवाढ

गोवंडीतील ऑरिस अॅग्रो लिमिटेडमधील कामगारांच्या मासिक वेतनात 10 हजार रुपये वाढ करणारा करार कामगार उत्कर्ष सभा युनियनने कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर केला आहे. हा करार युनियनचे अध्यक्ष जितेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस चिंतन जोशी यांनी केला.

या करारानुसार मूळ वेतनात 8 हजार रुपये, घरभाडे भत्ता 400 रुपये, शहर प्रवास भत्ता 500 रुपये, वैद्यकीय भत्ता 500 रुपयांची वाढ तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे. तसेच सेवानिवृत्तीला आलेल्या ज्येष्ठ कर्मचाऱयांना 500 रुपयांची विशेष वेतनवाढ देण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱयांना पुढील वर्षात प्रत्येक वर्षी 19 हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे. वर्षाअखेरीला 120 दिवस प्रतिवर्षी रजा साठवून ठेवण्याची सवलत दिली आहे. रात्रपाळीच्या कामगारांचा दरदिवशीचा भोजन भत्ता 50 रुपयांवरून 100 रुपये करण्यात आला आहे. आधीची वेतनवाढ, सोयीसुविधा, सेवा, शर्ती यात कपात न करता भविष्यात सुरू राहणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.