4 मे रोजी आदित्य ठाकरे यांची चिपळूणमध्ये जाहीर सभा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे शनिवारी 4 मे रोजी चिपळूणमध्ये येत आहेत.सकाळी साडे दहा वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे.या सभेची इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली असून सर्वांच्या क्रांतीची मशाल धगधगत आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मशाल चिन्ह घेऊन घराघरात पोहचत आहेत.खासदार विनायक राऊत विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत.खासदार विनायक राऊत यांनी पहिल्या टप्प्यात खळा बैठका घेऊन संवाद साधला.त्यानंतर जि.प.गट निहाय मेळाव्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. मशाल रॅलीने सर्वत्र प्रचाराचे रान पेटवले आहे.त्यानंतर रत्नागिरीत झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जाहिर सभेने सर्वांची मने जिंकली आहेत.

4 मे रोजी शिवसेना नेते आदित्य ठाकरे चिपळूणमध्ये येत आहेत.या सभेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी कॉंग्रेसचे नेते माजी खासदार हुसेन दलवाई,इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत,शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव,माजी आमदार रमेश कदम,सुभाष बने,लोकसभा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक,जिल्हाप्रमुख सचिन कदम,विलास चाळके राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने,कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड,आपचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी उपस्थित रहाणार आहेत.