परीक्षण – अंतरंगाचा वेध

>>अरविंद दोडे

फिनिक्स! नाव ऐकताच आठवतात त्या पक्ष्याच्या आख्यायिका. फिनिक्सकडे अमरत्व, पुनर्जन्म आणि मृत्यूनंतरचं जीवन यांचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. इजिप्तमध्ये यास सूर्याचं प्रतीक मानतात. सध्याच्या काळात जो माणूस मोठा आघात किंवा मोठा पराभव पत्करून पुनरागमन करतो त्याला आदरानं ‘फिनिक्स’ म्हणतात. प्राचीन ग्रीकपुराणात म्हटलंय, फिनिक्समध्ये अग्नीचा आत्मा आहे. आटलांटा, जार्जिया आणि सान फ्रान्सिस्को, पालिफोर्निया या शहरांत त्यांच्या ध्वजांवर चित्रित केलेल्या राखेतून उठलेल्या फिनिक्सचं प्रतीक आहे. अशा या अमरपक्ष्याच्या अंतरंगाची ओळख करून देणारा काव्यसंग्रह अनघा प्रकाशनानं प्रकाशित केला आहे.

राजश्री सावंत यांच्या कविता ‘फिनिक्सचे अंतरंग’ यात आहेत. फिनिक्सचा किलबि}ाट एक सुरेल राग असतो, असं हिंदुस्थानी कथेमध्ये वाचाय}ा मिळतं. तसाच राग कवयित्रिनं या संग्रहात आळवला आहे-

अंगाईचे सूर बाळा, पाळण्यात तू निजावे

डोळिय़ांच्या मंद वाती, आईला तू जागवावे!

आजकाल अशी अंगाई आपल्या जीवनातून गेलीय. तसंच लळा लावणारे तृष्णेचे ठसे पुसट झालेत. स्नेहसाखळी तुटूतुटू आलीय. सत्याचा हा अंत कवयित्री}ा बघवत नाही. प्रीतीच्या निष्ठेवर मन स्थिर होणं कठीण. ताटातुटीचा सिलसिला इतका वाढलाय की, ‘मैं और मेरी तनहाई’ गाणारे अनेक जीव एकाकी पडलेत. तेव्हा कवितासखी रात्रंदिवस साथ करते.

ओसरली रात्र उदासीन, स्मरण तुझीच जपमाळ,

शोषिले तिमिराचे वादळ, निवला हृदयाचा जाळ!

अविद्येची रात्र सरल्यावर ज्ञानाची पहाट फुटते. उगवतीची किरणं नवा जन्म देतात चिंतनाला आणि डोळय़ांतल्या दु:खांचा आषाढश्रावण केवळ वैराग्याचा वसंत घेउढन येतो. प्राप्त प्रारब्धाला देहाच्या तटावर उतरल्यावर स्वरूपाचे उद्गार काढावेसे वाटतात,

तिन्हीसांजेचा अबोल गुन्हा, पारंब्या आठवांची गुंतवळ,

अस्तित्वाचा सुप्त मागोवा, बोलक्या अंतरीची वावटळ!

बालपणीचं चांदणं सरतं, प्रीत झऱयाची झुळझूळ अंतरात घुमत राहते. अमृतकुंभ आत्मानुभूतीनं भरून जातो. त्याची नवलाई पाहून व्यथा-वेदनांचा विसर पडतो, भगवंताशिवाय कुणाला साद घालावी असं वाटत नाही, तेव्हा सुचते विश्वात्मक देवाची प्रार्थना-

नवी पालवी, अंकुरित होऊ दे,

भोगांचे भोगही, सारे संपू दे!

राजश्री सावंत यांच्या शैलीचं एक वैशिष्टय़ म्हणजे चित्रदर्शित्व! साध्या, सुबोध शब्दांतून एखाद्या व्यक्तीचं किंवा विषयाचं हुबेहूब चित्र‰त्या सहज चितारतात. आपल्या डोळय़ांपुढे उभ्या करतात. वस्तुनिष्ठ वर्णन असो वा शब्दनिष्ठ विचार, त्यांची कविता म्हणजे घरंदाजशालिनीचा प्रातिभविलास वाटतो. मोजक्या शब्दांत उगाच आलंकारिकतेचा अवलंब न करता ही चित्रं त्या निर्माण करतात.

संध्येच्या बुजल्या वाटा, चोरूनी परतली साद,

शिणला रेतीवर पदर, संकोचून आली याद!

सध्या आशयापासून आविष्कारापर्यंत, भाषाशैलीपासून प्रतिमासृष्टीपर्यंत कवितेत अनेक परिवर्तनं होत आहेत. हा बदल झाला तरी सावंतांच्या सुसंस्कारित सालस कवितेला म्लान होण्याची भीती नाहीए, हे वाचताना जाणवतं.

‘जरी काळ क्रूर वाटत असला, तरी तो कधी कधी हळुवारपणे रसिकता दाखवतो. तसा तो नसता तर प्रेम, माणूस, निसर्ग आणि अध्यात्म यांच्या चौकटीत गोड गाणी कुणी लिहिलीच नसती,’ असं रूमीनं म्हटलंय. म्हणूनच असंख्य जीवनकळय़ा उम}ताना दिसतात. कवयित्रीचा हा पहिलाच संग्रह आश्वासक असून पुढील काळात अधिक परिपक्वता अन् नित्यनूतनता जाणवेल असा विश्वास आहे. तरीही बहुतेक कवितांमध्ये चिंतनशीलता आणि जीवनविषयक सात्त्विक भूमिका पुरेपूर आहे. तरुण मनाचा सारा उत्साह, ताजेपणा, सूक्ष्म रसवंता आणि उत्कट संवेदनशीलता पानोपानी लक्षात येते. जगण्यातील विविधता आणि कुतूहल सर्वत्र प्रत्ययास येतं. वाहत्या पाण्यात एखादं देखणं निसर्गरम्य चिमुकलं बेट असावं तशी ही कविता आहे. वाचताना वाचक भूतकाळ आणि भविष्यकाळ विसरतो आणि वर्तमानात रंगून जातो. मात्र भूत-भविष्याचे काही सुखद रंग मनावर नकळतपणे उडतात. फिनिक्सचं अंतरंग नानाविध रंगांनी रंगलंय, एवढं मात्र खरं! प्रा. अशोक बागवे यांची अभ्यासपूर्ण छोटेखानी प्रस्तावनाही वाचनीय आहे.

फिनिक्सचे अंतरंग/काव्यसंग्रह

लेखिका : राजश्री सावंत

प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे

पृष्ठे : 120   मूल्य : रुपये 200/-