वक्ता अन् पोशाख

>>  किरण खोत, निवेदक, सूत्रसंचालक

वक्त्याला नेहमीच संभ्रमात टाकणारा प्रश्न म्हणजे कार्यक्रमाच्या दिवशी मी नक्की कोणत्या प्रकारचे कपडे घालू…

keâeÙe&›eâceele काय बोलायचे याविषयी एक वेगळेच दडपण कितीही तयारी केल्यानंतर वक्त्याच्या मनात हे असतेच. त्या दडपणात भर पडते ती पूर्व नियोजन न केल्यामुळे अचानक येणाऱ्या आणखी एका आव्हानामुळे. ते म्हणजे आपण त्या दिवशी कोणते कपडे घालायचे या प्रश्नामुळे. म्हणूनच कार्यक्रमाची आधी माहिती असल्यास आपल्या कपडय़ांचे नियोजन हेसुद्धा तितकेच अगोदर करून घ्यावे लागते.

तुमचे कपडे हे त्या कार्यक्रमाच्या रूपरेषेला अनुसरून असणे आवश्यक आहेत. जर त्या कार्यक्रमात एखादा ठरावीक रंग किंवा ड्रेस कोड ठरला असेल तर त्यानुसार तुम्हाला तुमचे कपडे घालणे योग्य ठरते. परंतु हे करत असताना तुम्ही वक्ते किंवा निवेदक म्हणून इतरांपेक्षा कसे उठावदार दिसाल याचीही काळजी तुम्हाला घेणे आवश्यक असते.

वक्त्याने जर श्रोत्यांना व आयोजकांना आवडणारा रंग घातला आणि अनुरूप वेशभूषा केली तर त्यांना आपलेपणा वाटतो. कपडे घालत असताना ते आपल्या शरीरयष्टीला जास्त घट्ट किंवा जास्त ढगळे तर होत नाहीत ना याचे भान आपल्याला असणे गरजेचे आहे. अनेकदा तुम्ही जेव्हा बोलत असता तेव्हा आयोजकांना हेदेखील विचारून घेणे गरजेचे आहे की, मी बोलत असताना माझ्या मागे एलईडी स्क्रीन आहे का किंवा कोणत्या रंगाचा बॅनर माझ्यामागे असेल त्या रंगाला विरोधाभास करणारे कपडे घातल्यास तुम्ही ते व्हिडीओ शूटिंग आणि पह्टोग्राफी यासाठी अनुकूल ठरते. चमकणाऱया वस्तू, अनावश्यक दागदागिने या सगळय़ा आणि श्रोत्यांच्या नजरेला खटकणाऱया गोष्टी घालणे वक्त्याने घालणे टाळावे.

वेळ दुपारची असेल तर तुम्ही जास्त तंग किंवा गर्मी होईल अशा पद्धतीचे कपडे परिधान केल्यास तुम्हाला घाम येतो आणि तुम्ही स्वतःच संभ्रमात जाता हा घाम मला दडपणामुळे आलाय की, आजूबाजूच्या हवामानामुळे. नक्की कोणत्या रंगाचे रंगसंगतीचे कपडे घालू समजत नसेल तर त्याविषयीचे ज्ञान असणाऱया मित्र-मैत्रिणीला किंवा फॅशन डिझायनरला त्याबद्दलचे मत विचारणे.

प्रवासात किंवा रंगीत तालीम करत असताना वेगळा पोशाख करावा. नेहमी अंतिम भाषणाचे किंवा सादरीकरणाचे कपडे हे स्वतःसोबत वेगळे न्यावेत. जसे तुम्ही बोलताना फ्रेश दिसणे ताजेतवाने दिसणे गरजेचे असते, तसेच तुमचे कपडेसुद्धा तितकेच फ्रेश आणि इस्त्राr केलेले, स्वच्छ धुतलेले असणे गरजेचे आहे. भाषण करत असताना स्वच्छ व नीटनेटके आणि टापटीप कपडे घाला, आपल्या आवडत्या विषयावर श्रोत्यांची दिलखुलास संवाद करा.

आत्मविश्वास गरजेचा

तुमचा आत्मविश्वास ज्या कपडय़ात तुम्हाला जास्त वाटतो त्या पद्धतीचे कपडे घालणे महत्त्वाचे आणि त्याहूनही महत्त्वाचे हे की, कपडय़ांवर जास्त लक्ष न देता आपल्या ‘पंटेंट’वर त्याहून अधिक लक्ष असणे गरजेचे आहे. कारण नुसतेच छान दिसून चालणार नाही, तर तितकेच छान बोलताही यायला हवे.