9.5 कोटी कर्मचाऱ्यांना ‘एआय’चे प्रशिक्षण देणार

अमेरिकेतील टेलिकॉम कंपन्या सिस्को, एक्सेंचर, एटफोल्ड, गुगल, आयबीएम, इनडीड, इंटेल, मायक्रोसॉफ्ट आणि एसएपीसह टॉपच्या टेक कंपन्या पुढील दहा वर्षांत जागतिक स्तरावर 95 मिलियनहून जास्त कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यावर भर देणार आहेत. यासाठी या कर्मचाऱ्यांना आर्टिफिशियल्स इंटेलिजन्स (एआय) चे प्रशिक्षण देणार आहे.

एका संयुक्त मीडियाच्या माहितीनुसार, कन्सोर्तियम सदस्यांनी एआयच्या प्रशिक्षणासंबंधी ही माहिती दिली. एआयचे महत्त्व आणि भविष्यात याचे परिणाम पाहून कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. या कंपन्यांनी सहा सल्लागारांच्या मदतीने एआय सक्षम सूचना आणि संचार प्रौद्योगिक (आयसीटी) वर्कपर्ह्स कन्सोर्टियम लाँच केले. एआयच्या कर्मचाऱयांवर होणाऱया प्रभावाविषयी ज्ञान देणे आणि कामगारांना संबंधित कौशल्ये आत्मसात करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे, असे सिस्कोच्या कार्यकारी उपाध्यक्षांनी सांगितले.

या कंपन्यांचा पुढाकार
सिस्को कंपनी – 2032 पर्यंत 25 मिलियन लोकांना सायबर सुरक्षा प्रशिक्षण देणार आहे.
आयबीएम कंपनी – 2032 पर्यंत 30 मिलियन लोकांना डिजिटल कौशल्य शिकवणार आहे.
इंटेल कंपनी – 2030 पर्यंत सध्याच्या आणि भविष्याच्या नोकऱयांसाठी 30 मिलियन लोकांना एआयचे प्रशिक्षण दिले जाईल.
मायक्रोसॉफ्ट कंपनी – 2025 पर्यंत इन डिजिटल कौशल्यांसह दहा मिलियन लोकांना प्रशिक्षित केले जाईल.
एसएपी कंपनी – जगभरातील दोन मिलियन लोकांना डिजिटल कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
गुगल कंपनी – युरोपमध्ये एआयच्या प्रशिक्षणासाठी 25 मिलियन युरो निधी.