‘त्या’ घडय़ाळाचा 12 कोटींना लिलाव

 

112 वर्षांपूर्वी टायटॅनिक जहाजाला जलसमाधी मिळाली. त्या वेळी जहाजावर दोन हजारांहून प्रवासी होते. टायटॅनिकच्या अवशेषांवर आजही संशोधन सुरू आहे. टायटॅनिक बुडताना त्यावर  एक सर्वात श्रीमंत प्रवाशी होता. उद्योगपती जॉन जेकब ऐस्टर असे त्यांचे नाव होते. जॉन यांच्या एका ऐतिहासिक घडय़ाळाचा नुकताच लिलाव झाला. हे सोन्याचे घडय़ाळ 12 कोटी रुपयांना विकले गेले. एकप्रकारे हा विश्वविक्रम असल्याचा दावा लिलावाशी संबंधित अधिकारी अँड्रय़ू एल्ड्रिज यांनी केला.

टायटॅनिक बुडाल्यानंतर एक आठवडय़ाने जॉन यांचा मृतदेह सापडला होता. त्या वेळी त्यांच्या खिशात हे घडय़ाळ होते. घडय़ाळासोबत जॉन जेकब ऐस्टरचे सोन्याचे कफलिंक्स सापडले होते. जॉन जेकब एस्टर हे जहाजावरील सर्वात धनवान व्यक्ती होते. त्या वेळी त्यांची संपत्ती 725 कोटी होती. अमेरिकेतील एक खासगी संग्राहक हेन्री ऍल्ड्रीज ऍण्ड सन्सने या वस्तू खरेदी केल्या.