भाऊसाहेब वाकचौरे यांचा शिर्डी दौरा, जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा रविवारी नेवासा तालुक्यातील सोनईच्या उत्तरेला मुळाथडी समजल्या जाणाऱ्या खेडले परमानंद सह वीस गावात मतदारांच्या गाठीभेटी व प्रचार दौरा करण्यात आला. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रत्येक गावात प्रचंड स्वागत करण्यात आले. दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले. शिवाय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन लाख रुपये कर्ज माफ केल्याने पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येणार असे शेतकरी ठामपणे बोलत होते.

भाजपच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा फटका शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात बसला. कांदा प्रश्नाविषयी व्यथा नागरिकांनी मांडल्या. वाकचौरे यांचा दौरा सकाळी नऊ वाजता खेडले परमानंद पासून सुरू झाला. शिरेगाव, पानेगाव, करजगाव, गोनेगाव, इमामपूर ,धनगरवाडी निपाणी निमगाव, नारायणवाडी ,उस्थळ दुमाला, नवीन चांदगाव, सुरेश नगर ,हंडी निमगाव भानशिवरा, माळीचिंचोरा, या वीस गावात रविवारी प्रचार दौरा व गाठीभेटीवर भर देण्यात आला . यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके नेवासा तालुकाप्रमुख मच्छिंद्र मस्के नेवासा शहर प्रमुख नितीन जगताप युवा सेना जिल्हाप्रमुख निरंजन नांगरे ,नेवासा विधानसभा संघटक पंकज लांबाते,तसेच मुळा साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तूवर उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष नंदकुमार पाटील. उपाध्यक्ष नाना नवथर. गावातील सरपंच सेवा संस्थेचे अध्यक्ष व नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येने प्रचार दौऱ्यात सहभागी झाले.