उद्या महापालिकेचे बजेट; मुंबईकरांना काय मिळणार? सलग दुसऱ्या वर्षी नगरसेवकांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प

मुंबईकरांना प्रतीक्षा लागून राहिलेला महापालिकेचा अर्थसंकल्प शुक्रवार, 2 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे दुपारी 12 वाजता शिक्षण खात्याचे बजेट प्रशासक तथा आयुक्त इकबाल सिंह चहल यांना सादर करतील. तर दुपारी 1 वाजता अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आयुक्तांना महापालिकेचा एकूण अर्थसंकल्पीय अंदाज सादर करतील. या अर्थसंकल्पातून मुंबईकरांसाठी कोणत्या नव्या योजनांची घोषणा केली जाते, कोणत्या सवलती दिल्या जातात की करवाढ होते याकडे सर्व मुंबईकरांच लक्ष लागले आहे.

मुंबई महानगरपालिकेत निकडून आलेल्या नगरसेककांची मुदत गेल्या 7 मार्च 2022 रोजी संपल्यानंतर गेल्या दीड कर्षापासून पालिकेच्या कारभाराचा गाडा आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या माध्यमातून हाकला जात आहे. यातच अजूनही निवडणुका झाल्या नसल्याने सलग दुसऱ्या वर्षी प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईकरांचे बजेट सादर होणार आहे. महापालिकेत सध्या निवडून आलेले सदस्य नसल्यामुळे पालिका कोणते नवे निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बजेट सादर झाल्यानंतर दुपारी 1 वाजता पालिका आयुक्त पत्रकार परिषदही घेणार आहेत.

आकडा वाढणार, करवाढ टळणार

कोरोना काळात पालिकेने दोन वर्षे मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादली नाही. त्यामुळे मालमत्ता करासारख्या करवाढीचे प्रस्ताव अंमलबजाकणीविना पडून आहेत. शिवाय कचऱ्यावर कर लावण्यासाठी पालिकेकडून ‘बायलॉज’मध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मात्र आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने मुंबईकरांवर कोणत्याही करवाढीचा बोजा पडणार नाही, अशी अपेक्षा क्यक्त केली जात आहे. मात्र आगामी निवडणुकांमुळे मिंधे सरकारच्या दबावामुळे मुंबईकरांमध्ये चांगला संदेश जाण्यासाठी फुगीर बजेट सादर होण्याची शक्यता आहे.

ठेवी घटल्याने अंतर्गत कर्जाचा पर्याय

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, सिमेंट-काँक्रीट रस्ते, प्रस्तावित समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रकल्प अशा प्रकल्पांसाठी मोठी तरतूद करावी लागणार आहे. मात्र गेल्या वर्षभरात पालिकेच्या 92 हजार कोटींच्या  ठेवींमधील आठ हजार कोटींच्या ठेवी घटल्याने मोठय़ा प्रकल्पांची देणी देण्यासाठी अंतर्गत कर्जाचा विचार होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे बजेटचा आकडा मोठा दिसेल.