ब्राझीलमध्ये अनोखी प्रेमकहाणी, ज्याने मोबाईल चोरला त्याच्याच प्रेमात पडली

ब्राझीलमध्ये एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. एक ब्राझीलियन महिला तिचा मोबाईल चोरणाऱ्या चोराच्याच प्रेमात पडली. त्यांची अजब प्रेमकहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांनी त्यांची ही रोमॅण्टिक प्रेमकहाणी ट्विटरवर व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली असून त्याला 38 हाजाराहून व्ह्यूज मिळाले आहेत.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझीलमधील एका कार्यक्रमात इमॅन्युएला म्हणून ओळखल्या जाणार्‍या महिलेने तिची पहिल्या डेटबाबत सांगितले की, मी तो राहतो त्या रस्त्यावरून चालत होते त्यावेळी माझा फोन चोरण्यात आला. तर त्या चोरट्याने क्लिपमध्ये शेअर केले की, तिच्या फोनवर तिचा फोटो पाहिला आणि तो तिच्या प्रेमात पडला. त्याने सांगितले, मला कोणी प्रेयसी नसल्याने मी अस्वस्थ होतो. पण ज्यावेळी त्या मोबाईलमध्ये मी तिचा फोटो पाहिला त्या क्षणाला मी तिच्या प्रेमात पडलो. किती सुंदर तरुणी आहे. मला रोज इतकी सुंदर तरुणी दिसत कशी नाही आणि मला तिचा फोन चोरल्याचा पश्चाताप झाला. त्या युगूलाची मुलाखत घेतली असता त्याला विचारले तू तिचा आधी मोबाईल चोरलास आणि नंतर हृदय त्यावर त्याने एकदम बरोबर असे उत्तर दिले. पोस्टनुसार, दोघंही गेली दोन वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. पण तरुणीचे आई-वडिल संभ्रमातच आहेत की, मुलीचा मोबाईल चोरणारा तरुण तिचा जोडीदार झाला आहे.

दरम्यान, त्यांच्या विचित्र प्रेमकथेने ट्विटर वापरकर्ते आश्चर्य व्यक्त करत आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार अशा प्रेमकथा  ब्राझीलमध्येच होऊ शकतात, तर काही युजर्संना ही कथा खूपच अनोखी वाटली आणि विश्वास बसला की प्रेम कधीही, कुठेही आणि कोणासोबतही होऊ शकते.