तुर्कस्तानातील हनी ट्रॅप; प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्रिटीश इसमाची हत्या

मूळ ब्रिटीश नागरिक असलेल्या ५७ वर्षीय मुरात अरपापे तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे  हनी ट्रॅपमध्ये अडकवून हत्या करण्यात आली. १९ वर्षीय महातरीम पेर्सिकलीसोबत अरपापे यांचे प्रेमसंबंध होते. तिच्याबरोबर नवीन आयुष्य सुरु करण्यासाठी अर्पापे तुर्कस्तानात स्थायिक झाले होते. सर्पील डेमिर, डोगन सारीयल्डीझ आणि फातिह एर्गिनोग्लू, एर्सन बसाक आणि महातरीम पेर्सिकली या पाचजणांनी मिळून हा हनी ट्रॅप रचला होता. अर्पापे तुर्कीला जाण्यापूर्वी बासाकच्या सोशल मीडियावर संपर्कात होते. बसाकने पैसे चोरण्याची योजना आखली होती. त्याच्याच कफेमध्ये महातरीम आणि अर्पापे यांची भेट घडवून आणण्यात आली. त्यांना पुरते प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना लीथालचे इंजेक्शन देऊन त्यांची हत्या करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी महातरीमला ताब्यात घेतले आहे.  सीसीटीव्हीने पीडित मुरात अर्पापे संशयित मुहतेरेम इमारतीत प्रवेश करताना दाखवले, त्यांच्या मागोमाग बाकीचे चौघे त्या अपार्टमेंटमध्ये शिरताना सीसी टीव्हीत दिसले. हा सगळा हनी ट्रॅप पैशांसाठी रचण्यात आला होता. बाकी चौघांचा पोलीस शोध घेत आहेत.