सोयीसुविधांसाठी चेंबूरमध्ये सरकारी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून वसतिगृहात देण्यात येणाऱया सोयीसुविधांमध्ये आधुनिक गरजांचा अभाव असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. जॉयनेस्ट प्रीमायसेस प्रायव्हेट लिमिटेड, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड तसेच क्रिस्टल गौरमेंट प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीकडून विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवल्या जातात. मात्र त्या निकृष्ट दर्जाच्या असतात. दरम्यान, चेंबूर येथे स्वतंत्र संत एकनाथ वसतिगृह उभारण्यात यावे, सेंट्रलाइज्ड भोजन पुरवठा कंत्राट रद्द करून, 6 नोव्हेंबर 2023 च्याच शासन निर्णयाच्या दराप्रमाणे अनुसूचित जातीच्याच लघु उद्योजकांना भोजन पुरवठा कंत्राट देणे, निर्वाह भत्ता व स्टेशनरी वेळच्या वेळी मिळावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी वसुली करणाऱया महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.