जरांगे यांची तुलना मद्यपी माकडाशी, भुजबळांचा तोल गेला आणि बरळले

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणाबाबत इशारा दिला. त्यानंतर ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. रागाच्या भरात त्यांचा तोल गेला आणि त्यांनी जरांगे-पाटलांवर हल्लाबोल केला. जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांची तुलना मद्यपीशी केली. आधीच माकड त्यात बेवडा प्यायलेला, असे म्हणत भुजबळांनी जरांगे-पाटील यांना लक्ष्य केले.

हा जरांगे आमची लायकी काढतो. तो काहीही बोलतो. मला म्हणतो, हा येवल्याचा येडपाट आहे. आता याला काय सांगायचं? एक म्हण आहे… आधीच मर्कट त्यात मद्य प्यायलेला… म्हणजे आधीच माकड आणि त्यात बेवडा प्यायलेला… जरांगे काहीही बोलतो. अरे आमची लायकी तू काय पाहतो, अशा शब्दांत भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर टीका केली.