छगन भुजबळांच्या ताफ्यातील गाड्या धडकल्या…वाहतुकीचा बट्याबोळ

ओबीसी महा एल्गार मेळाव्यासाठी राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले आहे. मात्र नगर शहरात त्यांचे आगमन झाले अन् तोच त्यांच्या ताफ्यातील वाहने एकमेकांवर धडकल्याची घटना घडली. शहरातील डीयेसपी चौक ते कोठला दरम्यान चार वाहने एकमेकांना धडकले. दरम्यान यानिमिताने नगर शहरातील वाहतूक शाखेकडून करण्यात आलेली वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दरम्यान मंत्री भुजबळ यांनी यावेळी गाडीतून उतरुन संबंधित वाहनधारकाची विचारपूस केली.

नियोजनाचा बच्चा बोल कशा पद्धतीने उडतो याचे उदाहरण नगरमध्ये आज पाहायला मिळाले मंत्री छगन भुजबळ यांच्या ताब्यातील वाहने ही ज्या वेळेला शहरांमध्ये अचानकपणे आली त्यावेळेला रस्त्याच्या बाजूला असलेल्या गाड्या एकमेकांवर धडकल्या गेल्या. आज एलगर परिषदेच्या वेळी मंत्री छगन भुजबळ हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे सुरुवातीला ते शासकीय विश्रामगृह येणार होते पण अचानकपणे दौरा बदलल्यामुळे ते नगर शहरातील बुरुडगाव रोडकडे निघाले. त्यांचा ताफा डीएसपी चौकातून कोठला मार्गे निघाला असता त्याच वेळेला जात असताना अचानकपणे सर्व वाहतूक शाखेची यंत्रणा कोलमडून गेली या ठिकाणी असलेल्या चार चाकी गाड्या एकमेकांवर आदळण्याचा प्रकार सुद्धा या ठिकाणी घडला व या ठिकाणी दुचाकी स्वराला सुद्धा चार चाकी ने धडक दिल्याचा प्रकार घडला आहे.