पैठणची जनता मंत्री भुमरेंना माफ करणार नाही; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे प्रतिपादन

‘पालकमंत्री संदिपान भुमरे हे स्वार्थापोटी भाजपच्या सोबत गेले आहेत. यासाठी पैठणची जनता त्यांना माफ तर करणार नाहीच. परंतु लवकरच त्यांचे पदसुद्धा जाणार आहे, ‘असे प्रतिपादन शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रकांत खैरे यांनी केले. पैठण शाखेच्या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. त्यांचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी स्वागत केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की. ‘1988 साली पैठणला मोठी दंगल झाली. तेव्हा हे कुठे होते ? खरे शिवसैनिक जेलमध्ये गेले. त्यांनीच हे तीर्थक्षेत्र वाचवले. आणि हे मात्र पंचायत समितीत सत्तेचे राजकारण खेळत होते.

नंतर मी छत्रपती संभाजीनगरचा पहिला हिंदू आमदार झालो. त्यानंतर 28 वर्षे दंगल काय… साधा तणाव निर्माण होऊ दिला नाही.’ असेही नेते चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले. मंत्री भुमरे यांनी विहामांडवा येथील शरद रेणुकादेवी साखर कारखान्याच्य माध्यमातून ‘मनीलॉड्रिंग’ केले असून, त्याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे विधिमंडळात विषय मांडणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या सभेस व्यासपीठावर संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले
कला ओझा, युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य सिद्धेश धाऊसकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, उपजिल्हाप्रमुख अंकुश रंधे, युवासेनेचे उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हायुवाधिकारी शुभम पिवळ, महिला आघाडी जिल्हा संघटक राखी परदेशी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक करताना तालुकाप्रमुख मनोज पेरे यांनी सांगितले की, पैठण तालुक्याला दोन वेळा फुटीचा डाग लागला आहे. पालकमंत्र्यांनी सध्या सूडाचे राजकारण सुरू केले असून, धमक्या दिल्या जात आहेत. परंतु, पैठण विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा झेंडा फडकावला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शहरप्रमुख अजय परळकर, बाळासाहेब घुले, शेषनारायण महाराज, कमलाकर वानोळे, बिडकीनचे सरपंच अशोक धर्मे, विकास गोर्डे, बद्रिनारायण भुमरे, सोमनाथ जाधव, संदीप लक्कडहार, स्वाती माने.
वनमाला पटेल, माजी नगरसेवक प्रकाश वानोळे, अंजली मांडवलकर, मंगल मगर, छाया देवराज, मंजूषा नागरे, रोहिणी काळे, दिनेश तिवारी, देविदास रत्नपारखी, अमोल निकाळजे, वीरु गादगे, परसराम खोपडे, राणा मापारी, ऋषिकेश फासाटे, पिंटू आहेर, आकाश काळे, अनिल पोटे, विजय गव्हाणे व माणिक पोकळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, पुरुष व शिवसैनिक उपस्थित होते.