थंडीचा जोर वाढणार, पारा 4 ते 5 अंश सेल्सियसने घटणार

उत्तरेत प्रचंड बर्फवृष्टी झाल्यामुळे आणि थंड वाऱयांच्या प्रभावामुळे राज्यभरात उद्यापासून थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अनेक भागांत तापमानात तब्बल 4 ते 5 अंश सेल्सियसची घट होऊ शकते. त्यामुळे कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच पुढील 24 तासांत राज्यभरात विविध भागांत पावसाची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.
मुंबईतील तापमान  (अंश सेल्सियसमध्ये)
बोरिवली 20
चेंबूर 19
कुलाबा 20
मुलुंड 20
सांताक्रुझ 19
पवई 20
वरळी 20
ठाणे 20
नवी मुबंई 20
छत्रपती संभाजीनगर, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीत पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.