संविधान बदलण्याबाबत लालू प्रसाद यादव यांनी घेतला भाजपचा समाचार

lalu prasad yadav

संविधान बदलण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आता राष्ट्रीय जनता दलाचे  नेते लालू प्रसाद यादव यांनी या मुद्द्यावरून भाजपला चांगलेच धारेवर धरले आहे. लालू यादव यांनी भाजपला पराभवाची भीती वाटत असल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते वारंवार संविधान बदलण्याचा उघडपणे बोलताना दिसतात. मात्र, त्यांच्यावर काही कारवाई करण्याऐवजी पंतप्रधान आणि भाजप नेते त्यांना बक्षीस म्हणून निवडणूक लढवायला लावत आहेत.

यासोबतच लालू यादव म्हणाले की, भाजपवाल्यांना काय हवे आहे? त्यांना संविधानाचा, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, गरीब यांचा काय प्रश्न आहे? संविधान बदल हा देशात समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय आणि आरक्षण संपविण्याचा डाव आहे. त्या लोकांना आरएसएस आणि भांडवलदारांचे गुलाम बनवायचे आहे. संविधानाकडे डोळे वटारून पाहाल तर देशातील दलित, मागासलेले आणि गरीब लोक तुम्हाला चांगलाच धडा शिकवतील असेही ते म्हणाले.

‘वारंवार संविधान बदलण्याबाबत बोलून काय सिद्ध करू पाहत आहात. आमचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वानाने लिहिले आहे. लोकशाहीवर विश्वास ठेवणारी या देशातील न्यायप्रेमी, शांतताप्रेमी आणि दलित-मागास जनता तुम्हाला तुमची दर्जा दाखवेल. संविधान बदलणारे तुम्ही कोण? देशातील जनता माफ करणार नाही…भाजपला हुकूमशाही आणायची आहे, संविधान बदलणे म्हणजे लोकशाही बदलणे…”अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली.