कोरोनाचं संकट गडद, सक्रिय रुग्णांचा आकडा 3 हजार पार; 24 तासात चौघांचा मृत्यू

देशात कोरोना पुन्हा एकदा हायपाय पसरू लागला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाचे संकट गडद झाले आहे. गेल्या 24 तासांमध्ये 752 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा 3 हजार पार पोहोचला आहे. तर शनिवारी 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

शुक्रवारी 640 रुग्णांची नोंद झाल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा 2669 वरून 2997 वर पोहोचला होता. आता शनिवारी आणखी 752 रुग्ण सापडल्याने सक्रिय रुग्णांची संख्या 3420 झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये (266) सापडले आहेत. तर कर्नाटकमध्ये 70, महाराष्ट्रात 15, तमिळनाडूमध्ये 13 आणि गुजरातमध्ये 12 रुग्ण सापडले आहेत.

शनिवारी केरळमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर कर्नाटक आणि राजस्थानमध्ये एका मृत्युची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 5,33,332 झढाली आहे. गेल्या 24 तासांणध्ये 325 लोकं योग्य उपचारांमुळे बरेही झाले असून कोरोनामुक्त होण्याऱ्यांचा आकडा 4,44,71,212 झाला आहे.

दरम्यान, बिहारमधील नितीश कुमार सरकार अलर्ट मोडमध्ये आले आहे. बिहार सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांना आणि रुग्णालयांना आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याचे, ताप, खोकला आणि श्वसनासंबंधी आजार असणाऱ्या रुग्णांची कोविड चाचणी करण्याचे, रुग्णालमध्ये सामान्य, ऑक्सिजन आणि आयसीयू बेड सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासह पाटणा, गया आणि दरभंगा विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांची चाचणई करण्याचे निर्देश दिले आहेत.