CWC 2023 IND VS SA कोहलीचे शतक, अय्यरचे अर्धशतक; आफ्रिकेसमोर विजयासाठी 327 धावांचे आव्हान

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याचा आज 35 वा वाढदिवस. वाढदिवशी विराट कोहलीने शतक ठोकत चाहत्यांना भेट दिली आहे. विराट कोहलीचे शतक व श्रेयस अय्यरच्या 77 धावांच्या जोरावर टीम इंडियाने 326 धावांचा डोंगर रचला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 327 धावांचे लक्ष्य दिले आहे.

कोलकाता येथील इडन गार्डन मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. रोहीत शर्मा व शुभमन गिल यांनी धडाकेबाज सुरूवात केली. मात्र 61 धावा झालेल्या असताना रोहीत शर्मा बाद झाला. त्यानंतर आलेल्या बर्थडे बॉय विराटने शतक ठोकत टीम इंडियाची कमान सांभाळली. विराट व श्रेयसने केलेल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाचा आकडा 300 पार गेला.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी डोकेच वर काढू दिले नाही. दक्षिण आफ्रिकेचा एकही खेळाडू 15 च्या वर रन करू शकला नाही. रविंद्र जाडेजाने पाच गडी बाद केले. तर मोहम्मद शमी व कुलदीप यादवने प्रत्येकी दोन व सिराजने एक गडी बाद केला. जसप्रीत बुमराहला मात्र आज यश मिळाले नाही.