…तर मग दाऊद इब्राहिमही निवडणूक लढवेल; दिल्ली उच्च न्यायालयाची टिप्पणी

तुरुंगात बंद असलेल्या राजकीय नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निवडणूक प्रचार करण्याची परवानगी देण्याची मागणी करणाऱया याचिकेवर विचार करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जर अशी परवानगी दिली जाऊ शकली असती तर दाऊद इब्राहिम आणि इतर कुख्यात गुन्हेगारदेखील राजकीय पक्ष काढून प्रचार करू शकले असते, तसेच बलात्कार आणि हत्येसारख्या गंभीर गुह्यांमध्ये दोषी ठरवलेल्या आणि शिक्षा झालेल्या गुन्हेगारांनीही राजकीय पक्ष काढला असता, अशी टिपण्णीही न्यायालयाने केली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती मनमोहन यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.