Delhi liquor policy case – अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर आज सुनावणी

arvind-kejriwal

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी कथित मद्य धोरण घोटाळ्याच्या अटकेविरोधात दिल्ली सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी 15 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. ट्रायल कोर्टाने त्यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. तर अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात पुरावे असून ही अटक बेकायदेशीर नाही, असा दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश होता. याविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 9 एप्रिल रोजी निर्णय देत केजरीवाल यांची याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती स्वर्णकांता यांनी निकाल वाचताना केजरीवाल कथित दारू घोटाळ्यात सहभागी असल्याचे दिसत आहे, असे सांगितले. तर अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात पुरावे असून ही अटक बेकायदेशीर नाही, असा दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश होता.  उच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की ईडीने मुख्यमंत्र्यांना 9 समन्स पाठवले होते पण ते हजर झाले नाहीत. याचिकाकर्त्याच्या वागणुकीमुळे अटक करणे आवश्यक झाले होते.

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक झालेले केजरीवाल हे पहिले विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्याशिवाय आप नेते मनीष सिसोदिया हे देखील अबकारी धोरण प्रकरणात गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून तुरुंगात आहेत. तर संजय सिंग यांनाही अटक करण्यात आली होती, मात्र ते नुकतेच जामिनावर तुरुंगातून बाहेर पडले आहेत.