मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस

rahul-gandhi-modi

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. भाजपा आणि काँग्रेसने जाती, धर्म आणि भाषेच्या आधारावर दोन समुदायांमध्ये फूट पाडल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या होत्या. निवडणूक आयोगाने दोघांकडून 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.