मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी 7 मेपर्यंत जबाब, साक्षीपुरावे द्या!

दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी साक्षीदारांचे आणि आरोपींचे जबाब आणि सर्वे साक्षीपुरावे 7 मेपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने सीबीआयला दिले आहेत. आतापर्यंत आरोपींविरोधात आरोपनिश्चिती झाली नसल्याचे सांगत कोर्टाने सुनावणी स्थगित केली. न्यायमूर्ती कावेरी बावेजा यांच्यासमोर सुनावणी झाली. 22 एप्रिल रोजी बीआरएस नेत्या के कविता यांच्या जामीन याचिकेवर निर्णय 2 मेपर्यंत राखून ठेवला. कविता सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. के कविता यांना ईडीने 15 मार्च रोजी हैदराबाद येथील बंजारा हिल्स निवासस्थानातून अटक केले होते. त्यानंतर 11 एप्रिल रोजी सीबीआयने त्यांना तिहार जेलमधून ताब्यात घेतले होते.