सिसोदियांच्या जामिनाचा फैसला 30 एप्रिलला

कथित मद्य घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी शनिवारी पूर्ण झाली. दिल्ली न्यायालयाने सीबीआयचा युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला. न्यायालय 30 एप्रिलला निर्णय देणार आहे.

सीबीआय आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांनी दाखल केलेल्या गुह्यांत सिसोदिया यांनी जामीनासाठी दाद मागितली आहे. त्यांच्या अर्जावर विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यापुढे सुनावणी झाली.